नटीला नटी नाही तर काय म्हणायचं? नवनीत राणांवरील बेताल टीकेचं संजय राऊतांकडून समर्थन
संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
Sanjay Raut : नटीला नटी नाही तर काय म्हणणार असं विधान करत संजय राऊतांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर सारवासारव केली. मात्र राऊतांच्या नवनीत राणांवरच्या विधानाने नव्या वादाला तोंड फुटणार आहे. यावरुन आता चांगलचे राजकारण तापले आहे.
संजय राऊत. ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते... जहाल भाषा ही राऊतांची ओळख.. मात्र विरोधकांवर जहाल टीका करताना राऊतांची जीभ अनेकदा घसरते.. अमरावती लोकसभेच्या खासदार नवनीत राणांवर टीका करतानाही राऊतांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केली..
नाची...डान्सर.. बबली.. अशा शब्दांमध्ये संजय राऊतांनी नवनीत राणांवर टीका केली... त्याचा व्हायचा तो परिणाम झाला... अमरावतीत संजय राऊतांविरोधात रवी राणा आणि भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. संजय राऊतांविरोधात महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मात्र राऊतांवर याचा काहीच परिणाम झालेला नाही... नवनीत राणांवर आक्षेपार्ह भाषेत केलेल्या टीकेवर राऊत ठाम होते... विशेष म्हणजे जयंत पाटलांशी बोलताना राऊतांनी पुन्हा तेच विधान केलं.. मविआ नेतेही राऊतांच्या या विधानाला दुजोरा देताना दिसतायत.. विरोधकांना आक्षेपार्ह भाषा वापरण्याची संजय राऊतांची ही काही पहिलीच वेळ नाही.. याआधी सुद्धा कॅमेऱ्यासमोर शिवीगाळ करणं असे प्रकार त्यांनी केलेच आहेत.
राजकारण्यांकडून च.. भ.. आणि झ ची भाषा वापरली जातेय.. सुसंस्कृत प्रगल्भ राजकारणाची परंपरा असलेल्या महाराष्ट्राला शिवराळ भाषेची लागण झालीय... हे थांबणार तरी कधी?
नवनीत राणा यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणा-या संजय राऊतांना देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर
नवनीत राणांसंबंधी संजय राऊतांनी केलेल्या विधानाचं त्यांनी पुन्हा समर्थन केलंय.. राऊतांचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय.. 'नटीला नटी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं?' असा सवाल विचारताना राऊत व्हिडीओत दिसतायत.. दरम्यान, नवनीत राणा यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणा-या संजय राऊतांना देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. या नेत्यांना महिलाच उत्तर देतील, असं फडणवीसांनी वर्ध्याच्या सभेत सांगितलं.
नवनीत राणांसंबंधी संजय राऊतांनी केलेल्या विधानाचं त्यांनी समर्थन केलंय. राऊतांचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय.. 'नटीला नटी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं?' असा सवाल विचारताना राऊत एका व्हिडीओत दिसतायत. विशेष म्हणजे जयंत पाटलांशी बोलतान राऊतांनी हे विधआन केलंय. मविआ नेतेही राऊतांच्या या विधानाला दुजोरा देताना दिसतायत.