Maharashtra Assembly Winter Session 2022: महाविकास आघाडीच्या मोर्चावरुन ठाकरे गट आणि भाजपमध्ये कलगीतूरा रंगलेला दिसत आहे. मोर्चापेक्षा लग्नाला जास्त गर्दी असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केली आहे. तर भाजपच्या लग्नातलं वराड दाखवा, असं म्हणत अजित पवारांनीही (Ajit Pawar) त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. त्यावरून आता फडणवीसांनी (Devendra Fadanvis) प्रत्युत्तर दिलंय. (Sanjay Raut shared the video of the Maratha Morcha crowd Fadnavis said will investigate marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणाची गर्दी जास्त, यावरून मोठा वाद सुरू असल्याचं दिसत आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्हिडीओ ट्विट केला...देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच, असं म्हणत संजय राऊतांनी एक व्हिडीओ (Sanjay Raut Tweet) शेअर केला होता. त्यावरून फडणवीसांनी टीकास्त्र सोडलं. संजय राऊतांनी मराठा मोर्चाच्या गर्दीचा व्हिडिओ ट्विट केला, त्याची 'चौकशी करणार' असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.


पाहा Video -



अजित पवार (Ajit Pawar) यांच्या तोंडून खोक्यांची भाषा शोभणार नाही. खोक्यांचा एकावर एक ढिग लावला तर शिखर इतके उंच होईल की, तिथेपर्यंत नजर पोहचणार नाही. अजितदादांच्या तोंडी खोक्यांची भाषा शोभत नसून राज्याचं लवासा करायचं नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लगावला.


दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session 2022) पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. अधिवेशनात लोकायुक्त बिल (Lokayukya Bill) मांडणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.