Sanjay Raut Slams Nilesh Rane: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये माजी केंद्रीय मंत्री तसेच विद्यमान खासदार नारायण राणे यांचे पुत्र तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते तसेच माजी खासदार निलेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्या निलेश राणेंना राऊतांनी सुनावलं आहे. यावेळेस त्यांनी गृहमंत्र्यांवरही टीका केली आहे.


नेमकं प्रकरण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी केंद्र सरकारने शरद पवार यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांना केंद्र सरकारकडून अती महत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाणारी झेड प्लस दर्जाची उच्च श्रेणीतील सशस्त्र सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला.गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलाला (CRPF) शरद पवारांना अधिक भक्कम सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिलेत. 83 वर्षीय शरद पवार यांच्या भोवती सुरक्षेचं कडं अधिक मजबूत केलं जाणार असून त्यांच्या सुरक्षेत 55 सशस्त्र सीआरपीएफ जवानांची टीम नियुक्त केली जाणार आहे. केंद्रातील एजन्सींनी केलेल्या धोका मूल्यांकनाच्या आढाव्यानुसार पवारांना मजबूत सुरक्षा कवच देण्याची शिफारस करण्यात आली होती. याचसंदर्भात सीआरपीएफच्या टीमने शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पवारांची सुरक्षा वाढवण्यावर एकमत झाल्यानंतर सुरक्षा


निलेश राणेंनी नोंदवला आक्षेप


शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुनच निलेश राणे यांनी टीका केली. शरद पवारांची सुरक्षा वाढवण्यात येणार असल्याचं रात्री उशीरा स्पष्ट झाल्यानंतर सव्वा अकराच्या सुमारास निलेश राणेंनी आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन प्रतिक्रिया नोंदवताना या निर्णयावर खोचक पद्धतीने आक्षेप घेतला.


"शरद पवारांना झेड प्लस सिक्युरिटी मिळाली आहे, 55 सीआरपीएफ जवान त्यांना संरक्षण देणार. मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कोणापासून त्यांना धोका आहे? बातमी वाचली आणि वाटलं की ५० वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही झेड प्लस संरक्षण मिळतं की काय?" असा खोचक सवाल निलेश राणेंनी विचारला आहे.


नक्की वाचा >> ''वर्षा'वर फाशी दिली की राजभवानावर?' संजय राऊतांचा CM शिंदेंना सवाल; 'बलात्कारी तर...'



राऊतांचा टोला


संजय राऊत यांना निलेश राणेंनी केलेल्या टीकेचासंदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी थेट नारायण राणेंनाही सुरक्षा देण्याची गरज नसल्याचं रोखठोक मत नोंदवत संताप व्यक्त केला. "त्याच्या बापाला पण केंद्राची सुरक्षा आहे. ती पण काढून घ्या. त्यांनी कुठे कळ काढली आहे?" असा टोला संजय राऊत यांनी निलेश राणेंसंदर्भातील प्रश्न ऐकवल्यावर लागवला. "शरद पवार यांच्यासारख्यांवर असं बोलणाऱ्या लोकांना गृहमंत्री आवरु शकत नसतील तर यांचा केंद्र सरकारबद्दल विश्वास आहे का?" असा प्रश्न निर्माण होत असल्याचं राऊत म्हणाले. "शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांबद्दल असं बोललं जात असताना देवेंद्र फडणवीस तोंड शिवून गप्प बसले आहेत," असं म्हणत राऊत यांनी नाराजी व्यक्त केली.