Latest Political News in Marathi : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. (Maharashtra Political News) संजय राऊतांवर टीका करताना त्यांनी शिवराळ भाषा वापरली. संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचं काम सुरु केले आहे. राऊतांच्या बडबडीची माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दखल घेत नाहीत याचा अर्थ उद्धव ठाकरे यांच्यावर राऊतांचा दबाव आहे, असा आरोप शिरसाट यांनी केला. ठाकरे गट 8 ते 10 दिवसांत रिकामा होईल, असा दावा शिरसाट यांनी केला. 


राणे यांच्या वक्तव्याचे शिरसाटांकडून समर्थन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. शिंदे गटाने उठाव केला तेव्हा मी हेच म्हणालो होतो. शिवसेना संपवण्याचे काम संजय राऊत करत आहेत. त्यांना बडवे नाही तर भडवे म्हणा, असेही मला लोक म्हणाले. संजय राऊत यांना शिवसेना वाढावी असे वाटत नाही, ते शिवसेना संपवत आहेत. राऊत हे आपले अस्तित्व टिकवण्याची ही धडपड करत आहेत, असे शिरसाट म्हणाले.


सुषमा अंधारे यांना आता  शांत करण्यात आले आहे. मात्र संजय राऊत यांचे सुरुच आहे आणि ते शिवसेना संपल्यावरच थांबतील असे शिरसाट म्हणाले. शिवसेनेचे रावते सारखे अनेक नेते संपले सगळं वाटोळं संजय राऊत करत आहे. उद्धव साहेब याची का दखल घेत नाही कळत नाही, हे कळायला मार्ग नाही, असे शिरसाट म्हणाले. संजय राऊत जेल मधून सुटून आल्यावर उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे संजय राऊत याच स्वागत केलं होतं, हे इतिहासात पहिल्यांदा घडला आहे. कुणाला भेटायचेच होतं तर ठाकरे साहेबानी त्या पत्रा चाळीतील लोकांना भेटण्याची गरज होती, असेही शिरसाट म्हणाले. 


अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी बंडखोरांना जोडो मारतो म्हटलं हे शोभत नाही. ते संजय राऊत यांच्या चेल्यासारखे वागत आहेत. शिवसेना डुबवायचं काम सुरु आहे, असा टोला शिरसाट यांनी लावला. अब्दुल सत्तार यांनी माझ्यावर कुठलेही आरोप केले नाहीत. ते माझे मित्र आहेत, आणि मुख्यमंत्र्यांना जी तक्रार त्यांनी केली असेल त्यावर मुख्यमंत्री काहीतरी करतील असे शिरसाट म्हणाले.


मंत्रिमंडळ विस्तार लवकर - शिरसाट


मंत्रिमंडळ विस्तार लवकर होईल, करावाच लागेल, मागणी सुद्धा आहे, असे शिरसाट म्हणाले. त्यात कुणाला मंत्रिपद मिळेल यात मला जास्त रस नाही. मात्र मला अपेक्षा आहेत. 20 ते 22 दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे शिरसाट म्हणाले. उद्धव गटाचे लोक, कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. यावर नीलम गोऱ्हे म्हणताय याचा पक्षाने विचार करायला हवा, मी त्यांच्या मताशी सहमत आहे असे शिरसाट म्हणाले.