देहू : जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने आज पंढरपूरच्या प्रस्थान ठेवलं. सकाळपासूनच वारी करता दाखल झालेल्या दिंड्या आणि वारकरी यांच्या गर्दीने देहू फुलुन गेलं होतं. आज पहाटे पासूनच मंदिरा मध्ये सुरु झालेल्या  काक़ड आरती अभिषेक, भजन किर्तनान् येथील वातावरण विठठ्लमय झालं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने दुपारी प्रस्थान ठेवलं, आणि विणेकरी टाळकरी आणि वारक-यांनी तुकोबांच्या नामाचा एकच जयघोष केला. विठ्ठलनामाच्या जयघोषाने संपुर्ण देहूनगरीचा परिसर निनादून गेला आहे. 


आज तुकोबांच्या पालखीचा मुक्काम हा इनामदार वाड्यात असणार आहे. तर शनिवार सकाळी जगदगुरुंची पालखी ही अनगडशहा बाबांच्या दर्ग्यांवर भेट देऊन मार्गस्थ होईल. निगडीला दुपारची विश्रांती घेऊन उद्या पालखीचा मुक्काम हा आकुर्डीला असेल.