मुंबई : आता बातमी झी 24 तासच्या इम्पॅक्टची.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यवतमाळच्या सपना इंगळे या विधवेला शासनातर्फे सानुग्रह मदतीचा चेक अखेर मिळाला आहे. सपना इंगळे यांच्या पतीचं विजेच्या धक्क्यानं निधन झालं. अपघातग्रस्तांच्या कुटुंबाला केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सामाजिक अर्थ सहाय्य योजनेतून मदत केली जाते. त्या अंतर्गत सरकारकडून सानुग्रह मदत म्हणून मिळालेला २० हजार रुपयांचा चेक स्टेट बँकेत तब्बल तीन वेळा वटला नव्हता.


गंभीर बाब म्हणजे या प्रकरणी, स्टेट बँकेनं सपना इंगळे यांनाच दोषी ठरवत त्यांच्यावर दंडही आकारला. झी २४ तासनं याबाबतचं वृत्त प्रसारित केल्यानंतर जिल्हा प्रशासनानं चौकशी सुरु केली होती. त्यावर हा चेक संगणकीय त्रुटीमुळे जमा झाला नसल्याचं, स्टेट बँकेनं सांगितलं.


तसंच सपना इंगळे यांना आकारलेल्या दंडाचाही स्टेट बँकेनं परतावा करुन झालेल्या गैरसोईबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. आणि सपना इंगळे यांना पालकमंत्र्याच्या हस्ते चेक वितरीत करण्यात आला.