सप्तशृंगी गडाचा कारभारही शासनाच्या ताब्यात ? ग्रामस्थांचा विरोध
सप्तशृंगी गडाचा कारभार शासनाच्या ताब्यात जाणार अशी सुत्रांकडून माहिती मिळतेय.
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडाचा कारभार शासनाच्या ताब्यात जाणार अशी सुत्रांकडून माहिती मिळतेय. शिर्डी, शनी शिंगणापूर पाठोपाठ सप्तशृंगी वणी गडाचा कारभारही सरकार ताब्यात घेणार आहे. अशी माहिती समोर येतेय. मंत्रालय आणि शासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. राज्यात देवीची साडेतीन शक्तीपीठ आहेत. कोल्हापूर, तुळजापूर, माहूर गड आणि वणीची सप्तश्रृंगी अशी साडे तीन शक्तीपीठ आहे. तुळजापूर देवस्थानावरही प्रशासनाचं नियंत्रण आहे.
'पुजारी हटाव' मोहीम
कोल्हापूर मंदिरातही 'पुजारी हटाव' मोहीमेवरुन वाद आहे. सप्तशृंगी गडाबाबत आता काय निर्णय होतोय, याकडे भाविकांचं लक्ष लागलंय. शनिशिंगणापूर मंदिराचा कारभार सरकारच्या ताब्यात देण्यास ग्रामस्थांनी विरोध केलाय.