Nashik News : येत्या 5 जानेवारीला जवान घरी परतणार होते. कुटुंबीयांचे डोळे उंबरठ्याला लागले होते, तर मुला-बाळांना आणि पत्नी, आई-वडिलांना भेटण्यास जवानही आसूसलेला होता. मात्र झाले असे की तो घरी आला, मात्र तिरंग्यातून गुंडाळून आला आहे. सारंग अहिरे (Sarang Ahire) असे या नाशिकच्या जवानाचे नाव आहे. त्याच्या या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण महाराष्ट्रावर (Maharashtra news) शोककळा परसली आहे.  


पार्थिव बुधवारी दाखल होणार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकचे सुपुत्र असलेले सारंग अहिरे (Sarang Ahire) भारतीय सैन्य दलात (Indian Army Soldier) होते. सारंग हे आसाम राज्यात कर्तव्यावर असताना त्यांचे निधन झाले आहे. रविवारी 25 डिसेंबर रोजी रात्री सारंग अहिरे कर्तव्यावर असताना त्यांचे निधन झाल्याची माहिती संबंधित विभागामार्फत देण्यात आली आहे. मात्र मृत्यूचे अधिकृत कारण अद्याप समजू शकले नाही. सारंग अहिरे यांचे पार्थिव बुधवार 28 रोजी जायखेडा येथे पोहोचण्याचा अंदाज असून त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 


3 महिन्यापुर्वीच घरी आले होते...


सारंग अहिरे (Sarang Ahire) तीन महिन्यांपूर्वी घरी येऊन गेले होते. त्यानंतर पुन्हा कर्तव्यावर जाताना काही महिन्यांनी लवकरच घरी परतेन अशी ग्वाही त्यांनी कुटूंबियांना दिली होती. येत्या 5 जानेवारीला ते घरी परतणार होते. सुट्टीला अवघे काहिच दिवस बाकी होते. मात्र नियतीला काही वेगळचं मान्य होत आणि त्यांचे आसाम (Assam) राज्यात कर्तव्यावर असताना निधन झाले.


असे सैन्यात भरती झाले 


सटाणा (Satana) येथील जायखेडा गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सारंग (Sarang Ahire) यांनी अतिशय हलाकीच्या परिस्थिती आपले शिक्षण घेतले होते. जायखेडा जनता इंग्लिश स्कुल मधून त्यांनी दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. तर बारावीचे शिक्षण ताहाराबाद येथे घेतले होते. शेतकरी कुटुंबातील सारंग हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत वयाच्या 19 व्या वर्षी सैन्य दलात भरती झाले होते. आणि पुणे येथे सेवेला प्रारंभ झाला.सैन्यदलात 103 इंजिनियर कमांड मध्ये ते गेल्या अकरा वर्षांपासून कार्यरत होते. 


दरम्यान सारंग अहिरे (Sarang Ahire)  यांच्या मृत्यूची बातमी कळताच बागलाण तालुक्यासह नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. सारंग अहिरे याचे पार्थिव आज दुपारपर्यंत जायखेडा येथे पोहचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.