सातारा : जिल्ह्यात 88 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेला ऑटोरिक्षात बसवून ऑक्सिजन दिला गेल्याची धक्कादाय़क घटना समोर आली आहे. सरकारी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याच्याने रुग्णालयाच्या बाहेर रिक्षात बसून ऑक्सिजन देण्यात आला आहे.


 
 सोमवारी वृद्ध महिलेचा फोटो सोशलमीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर संबधित महिलेला एका खासगी रुग्णालयात बेड मिळाला. साताऱ्यात एका दिवसात 991 म्हणजेच साधारण एक हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 10 जणांचा उपचाऱ्यादरम्यान मृत्यू झाला आहे.
 
 महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे थैमान सुरू असून देशातील सर्वाधिक प्रभावित राज्य आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 
 
 राज्यातील कोरोना उपचार आणि मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी होतेय की नाही हे तपासण्यास आलेल्या केंद्रीय टीमला सातारा, सांगली आणि औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजनांमध्ये कमतरता दिसून आली. त्यासंबधीचा रिपोर्ट त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.