मुंबई : भारतीय वायू सेनेच्या ग्लोबमास्टर C-17 विशेष विमानाने आज सकाळी 8 वाजता चीनच्या वुहान शहरातून 76 भारतीय नागरिकांना भारतामध्ये आणण्यात आले. य़ा विमानातून सातारच्या अश्विनी पाटील देखील मायदेशी परतल्या आहेत. अश्विनी यांच्यासह ८ नागरिक मायदेशी परतले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष विमानाने परतलेले प्रवासी तोंडाला मास्क लावून दिसले. या प्रवाशांना काही दिवस वेगळे ठेवून त्यांच्या विविध तपासण्या करण्यात येतील. संपूर्ण तपासणीनंतरच त्यांना घरी पाठवण्यात येणार आहे. आज सकाळी विमानाने परतलेल्या भारतीयांची दोन विशेष केंद्रांमध्ये ही व्यवस्था करण्यात आली आहे. लष्कर आणि इंडो-तिबेटी सीमा पोलिसांनी ही व्यवस्था केली आहे. 



दरम्यान परतलेल्या भारतीयांपैकी कोणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. सातारच्या अश्विनी पाटील यांनी एक व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर करत मदतीची याचिका केली होती.