तुषार तपासे, झी 24 तास, सातारा : दिवसेंदिवस अवकाळी पावसाचे प्रमाण वाढतच चाललंय पण त्यामुळे शेतकरी राजाला या अवकाळी पावसाचा फटका बसतो आहे. या अवकाळी पावसातून आपल्याला आपल्या पिकाला वाचवण्यासाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत आहेत. (satara farmer sunil bhilar Successful experiment about Strawberry crop paper)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भिलार या गावातील सुनील भिलारे यांनी त्यांचं स्ट्रॉबेरीचे पिक वाचवण्यासाठी एक अनोखा प्रयोग केला आहे.



अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या पिक भुईसपाट होतं. हे नुकसान टाळण्यासाठी आता त्यांनी अनोखी योजना केली आहे. अनेक संकटांनी पिचलेल्या या शेतकऱ्याचं या अवकाळी पावसामुळे अक्षरशः कंबरड मोडतं.


वारंवार होणाऱ्या या अवकाळी पावसाचा लहरीपणातून आपल्या स्ट्रॉबेरी पिकाचे होणारे नुकसान कसे थांबवू शकतो याबाबत संशोधन करायला सुरुवात केल्यानंतर साताऱ्यातील भिलार गावातील सुनील भिलारे या शेतकऱ्याला क्रॉप पेपर कव्हरचा पर्याय सापडला आहे.


आधी इंटरनेटच्या माध्यमातून सर्व माहिती घेऊन भिलारे यांनी हा क्रॉप पेपर मिळवून स्ट्रॉबेरीच्या पिकावर अच्छादन केलं .त्यामुळे गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका त्यांना बसला नाही.


क्रॉप पेपर म्हणजे काय? तो कुठून मिळतो? क्रॉप पेपरची सगळी माहिती सुनील भिलारे यांनी घेतली. सुनील भिलारे यांनी घेतली आणि या क्रॉप पेपरचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे.


इतर देशांमध्ये याचा यशस्वी प्रयोग केला जातोय मात्र भारतात फक्त राजस्थानमध्ये या क्रॉप पेपरच्या पद्धतीचा वापर केला जातोय महाराष्ट्रात अद्याप तरी कोणीच या क्राफ्ट पेपर चा उपयोग करत नाही कारण तो खर्चिक आहे आणि त्याला कोणतेही अनुदान अजून तरी राज्य शासनाकडून मिळत नाही ते अनुदान मिळावं अशी मागणी देखील सुनील भिलारे यांनी केली आहे.