सातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे आपल्या स्टाईल, शैलीसाठी नेहमी चर्चेत असतात. जनतेच्या मागण्यांसाठीही ते नेहमी आक्रमक झालेले दिसतात. यावेळी ते एका वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. 'सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे नक्षलवाद उफाळत असल्याचे सांगत भविष्यात या नक्षलवाद्यांचं नेतृत्व करूट, असं उदयनराजे म्हणालेत. त्यांच्या या गंभीर वक्तव्यावर राजकीय क्षेत्रात चर्चा रंगू लागल्या आहेत.


कार्यालयावर मोर्चा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्यातील 'खटाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा' या मागणीसाठी खासदार उदयनराजे यांनी वडूज इथं आंदोलन केलं.


त्यांनी बैलगाडीसह वडूज प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.


'खटाव तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करावा या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे' यावेळी खासदार उदयनराजेंनी सांगितलं.