तुषार तापसे, झी मीडिया, सातारा : राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. सातारा-कराडच्या खाजगी कोविड रुग्णालयांत काही तास पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याची माहिती मिळतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांकडून ऑक्सिजनची मागणी होऊनदेखील पुरवठा होत नाहीये. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


रुग्णालयांनी ऑक्सिजन अभावी हतबलता व्यक्त केली आहे. दक्ष कराडकर या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पोर्टेबल ऑक्सिजनची तातडीने व्यवस्था केली आहे.


तरीही ऑक्सिजनचा पुरवठा झाला लवकरच झाला नाही. तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.


 नाशिकमध्येही ऑक्सिजन टंचाई...


नाशिक शहरात काल पालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर लिक झाल्यामुळे 22 रुग्णांना नाहक आपला जीव गमवावा लागला. आजही नाशिकातील पाच रुग्णालयातील ऑक्सिजन संपण्याच्या मार्गावर आहे. रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णांच्या नातेवाईकांना संपर्क करून रुग्णांना दुपारपर्यंत दुसरीकडे हलवण्याविषयी विनंती केली आहे. 


ऑक्सिजन सिलेंडर लिकच्या कालच्या घटनेनंतर आपल्या रुग्णालयात अशा काही घटना घडू नये. आणि नातेवाईकांचा रोष ओढवून घेऊ नये म्हणून रुग्णालयांनी 12 वाजेपर्यंत आपले रुग्ण दुसरीकडे नेण्याचा सल्ला दिला आहे. 


शहरातील लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठ्यात विलंब होत आहे. त्यामुळे रुग्णांचे मृत्यू होऊ नयेत म्हणू रुग्णायांनी जबाबदारी झटकल्याचे दिसून येत आहे.