तुषार तपासे, झी मिडिया, सातार : सातारा जिल्ह्यातील पालच्या खंडोबा देवाची यात्रा महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा आहे.  पालीच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख आहे.पण ही यात्रा कधी पासून भरते याबाबत त्या भागातील अनेकांना काहीच सांगता येत नाही.पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी पासून ही यात्रा भरते आहे हे मात्र नक्की(satara pali khandoba yatra 2024).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थित पालच्या खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत, खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी भाविकांकडून भंडारा खोबऱ्याची उधळण करण्यात आल्याने सर्व मंदिर परिसर पिवळ्या रंगात न्हावून निघाला.अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्शवभूमीवर पालच्या मंदिरातील खंडोबा आणि म्हाळसा यांचा मूर्तींना आकर्षक अशी फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते.


महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान असणारे कराड तालुकयातील पालच्या खंडोबा आणि म्हाळसा विवाह सोहळा येळकोट ,येळकोट, जय मल्हारच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थित पार पडला. रथातील देवावर भाविकांनी भंडारा खोबऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोष केला. महाराष्ट्रातील मोठ्या यात्रामध्ये पालच्या श्री खंडोबाच्या यात्रेचा समावेश होतो.


या यात्रेत येणाऱ्या भाविंकांच्या सुरक्षितेसाठी सातारा पोलीस प्रशाशनच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .या यात्रेत अनेक गावातुन कावडी वाजत गाजत आणल्या जातात.पाल गावाचे मूळ नाव राजापुर असे होते श्री खंडोबाची निष्ठावान सेविका पालई गवळण हिच्या नावावरुन पालई आणि नंतर पाली असे नाव झाले असावे असे म्हटले जाते.


मंदीराच्या मध्यभागी मेघडंबरी असुन त्यामध्ये शाळुंकेवर खंडोबा आणि म्हाळसा यांची स्वयंभु लिंगे असुन त्यांच्या पुढे गादिवर त्यांचे मुखवटे ठेवले आहेत. मेघडंबरी मागे घोड्यावर सपत्नीक बसलेल्या खंडोबा आणि प्रधान हेगडी यांच्या मुर्ती आहेत उजव्या बाजुला बानाईची हात जोडलेली मुर्ती असुन या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे भाविक लोक लंगर तोडणे, जागरण, नैमित्तिक वाघ्यामुरळी बनविने, भंडारा खोबरे उधळने असे विधी केले जातात. दर वर्षी पाैष महिण्यात शुक्ल त्रयोदशिला मूळ नक्षत्रावर श्री खंडोबा आणि म्हाळसा विवाह यात्रा भरते . या वर्षी ही यलकोट यळकोट जय मल्हार, सदानंदाचा यळकोट म्हणत भंडा-याची उधळण करीत पाल दुमदुमुण गेली होती या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्णाटक, आंद्रप्रदेश या राज्यातुन लाखो भाविक दाखल झाले आहेत.