दीपक भातुसे, झी मीडिया, सातारा : साताऱ्यातील चव्हाण दाम्पत्याने आपल्या बाळाचे नाव शंभुराज ठेवलंय. गृहराज्य शंभुराज देसाई यांच्या नावावरुन हे नामकरण करण्यात आलंय. गर्भवती असलेल्या या महिलेला कोरोनाच्या संकटकाळात शंभुराज यांनी मदतीचा हात पुढे केला. या उपकाराची आठवण आयुष्यभर राहावी म्हणून रणजित चव्हाण यांनी आपल्या बाळाचे नाव शंभुराज ठेवण्याचा निर्णय घेतला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्याला वास्तव्यास असणाऱ्या रणजित यांच्या नऊ महिन्यांनी गर्भवती असलेल्या पत्नीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. योग्य उपचारासाठी त्यांना नायर रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. आधीच रुग्णांसाठी खाटा नाहीत. अशा परिस्थितीत गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांना रणजित चव्हाण यांनी फोन केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शंभुराज देसाई यांनी नायर रुग्णालयात संपर्क करुन स्वत: याचा पाठपुरावा केला. रणजित यांच्या पत्नीला नायरमध्ये बेड उपलब्ध झाला. एवढंच नव्हे तर शंभुराज देसाई आपल्या व्यस्त कामातून वेळ काढत याचा पाठपुरावा करत राहीले. 



१४ मेला रणजित यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्यानंतर ३ दिवसातच म्हणजे १७ मेला आई आणि बाळाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. यामुळे संपूर्ण चव्हाण कुटुंबीयांना क्वारंटाईन व्हावे लागले. पण या दोघांनीही कोरोनावर यशस्वी मात केली. 


यानंतर रणजित चव्हाण यांनी शंभुराज देसाईंना पत्र लिहून त्यांचे आभार मानले. तसेच ही आठवण आमच्या आयुष्यभर लक्षात राहावी म्हणून बाळाचे नाव शंभुराज ठेवत असल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले.