सातारा: ऐन तारुण्यात मुले मुलींना इम्प्रेस करण्यासाठी किंवा चेष्ठा कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. काही मुले रस्त्यावर बाईकचे स्टंट करताना दिसतात, तर काहीजण 'शोले स्टाईल' ऊंचावर जाऊन प्रपोज करतात. या स्टंटच्या नादात आपल्यासह इतरांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो याची जाणिवही त्यांना राहत नाही. त्यामुळे नको त्या घटना घडतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्यातूनही एक असाच प्रकार समोर आला आहे. एक तरुण आपल्या मैत्रिणींना इम्प्रेस करण्यासाठी पिस्तल घेऊन आला. इथपर्यंत ठिक होतं पण त्याने शायनिंग मारत पिस्टल चालविण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम अपेक्षित असाच झाला. पिस्टलमधून गोळी बाहेर आली.


एमआयडीसीतील समर्थ कॉलनी परिसरात गणेश क्लिनिक जवळच्या घटनेची आज राज्यभरात चर्चा होत आहे. एखादी व्यक्ती शायनिंग मारण्याच्या नादात कोणत्या थराला जाऊ शकते, याचा प्रत्यय आज सातारकरांना आला. एका व्यक्तीने आपल्या दोन मैत्रिणींसमोर पिस्तुलातून जमिनीवर फायरिंग केल्याची धक्का दायक घटना घडली आहे.



या घटनेत कोणीही जखमी झाले नसून याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. 


याबाबत त्याची चौकशी विचारपूस केली असता मैत्रिणींसमोर चेष्टेमध्ये हा प्रकार घडला असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत. याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.