अमर काणे / नागूपर : ED action against Satish Uke : काँग्रेस वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने छापा टाकलाय. सतीश उके यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यानंतर ही धाड टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सतीश उके यांच्यासोबत त्यांचे भाऊ प्रदीप उके यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात अनेक केसेस केलेल्या आहे. एका प्रकरणाचा निकाल चार दिवसात लागणार होता. त्याआधीच सतीश यांना उचललं. तसेच यासंबधी पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे, असा गौप्यस्फोट त्यांचे लहान भाऊ शेखर उके यांनी केला आहे.


'केंद्रीय यंत्रणा गैरवापर करुन कारवाई'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतीश उके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निवडणूक याचिकेत बाजू मांडली होती. सतीश उके यांनी अनेक मोठ्या प्रकरणात मोठा युक्तीवाद केला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकरणातही उके हे फडणवीसांविरोधात बाजू मांडत होते. त्यावेळीही सतीश उके बरेच चर्चेत राहिले होते. आज नागपुरातील त्यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. जो व्यक्ती मोदी यांच्या सरकार विरोधात भूमिका मांडेल त्यावर केंद्रीय यंत्रणा गैरवापर करत कारवाई करत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिली आहे. वकील उके यांच्यावर केलेल्या ईडी कारवाईनंतर पटोले यांनी टीका केली आहे.


फडणवीस केसच्या निकालाआधीच धाड



अ‍ॅड सतीश उके आणि प्रदीप उके यांना ईडीने ताब्यात घेतले, अशी माहिती त्यांचे बंधू शेखर उके यांनी दिली. यावेळी शेखर उके यांनी या कारवाईवरून अनेक सवाल उपस्थित केले आहेत. सकाळी 5 वाजता ईडीने छापा टाकला. सतीश उके यांनी  माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात अनेक केसेस केलेल्या आहेक, एका प्रकरणाचा निकाल चार दिवसात लागणार होता. त्यासाठी त्यांनी सतीश उके यांचा लॅपटॉप, मोबाईल जप्त केला आहे. ईडीने कागदपत्र पाहणी केली. लॅपटॉप जप्त केला. त्यामुळे फडणवीस यांच्याविरुद्धच्या केसेस आणि भविष्यातील केसेस  तसेच जज लोया केस, निमगडे केस हे सर्व लॅपटॉपमध्ये होते. त्यामुळे हे पुरावे नष्ट केले जातील, असा मोठा गौप्यस्फोट शेखर उके यांनी केल आहे.


फडणवीस यांच्याकडून काही लोक आले होते की, तुम्ही आमच्याकडे सामील व्हा, पैशाचे अमिष दाखवले गेले होते. आमच्याकडे असलेले  पुरावे ते नष्ट करतील, असा दावा शेखर उके यांनी केला आहे.