Satyajit Tambe On Ashok Chavan Resignation : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आज कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. महाराष्ट्र काँग्रेसचा चेहरा म्हणून अशोक चव्हाण यांची ओळख आहे. त्यामुळे आता अशोक चव्हाण जाता जाता 10 आमदार घेऊनच जाणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. मात्र, अशोक चव्हाण यांना काँग्रेसच्या 17 आमदारांचा पाठिंबा असल्याचं चित्र देखील समोर आलंय. अशातच आता काँग्रेसला वाईट दिवस सुरू झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर नाराज होऊन बाहेर पडलेले युवा नेते आणि विधानपरिषदेतील आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले सत्यजीत तांबे?


महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाची स्थिति पाहून मनाला खूप वेदना होत आहेत. ज्या संघटनेसाठी मी आयुष्याचे 22 वर्ष तन, मन, धनाने दिलं त्याची ही हालत पाहून अस्वस्थ झालोय. खूप काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही, अशी पोस्ट सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी केली आहे. 



नाना पटोले म्हणतात...


काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, शिवसेना पक्ष फुटण्यापूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत त्यांची भूमिका अतिशय महत्वाची असताना शिवसेनेच्या त्यावेळच्या संभावित बंडखोर आमदारांसह त्यांनी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील असं जवळपास निश्चित झाले होते. परंतु, अशोकरावांनी स्वतः मीडियासमोर येऊन अशा चर्चा धुडकावून लावल्या होत्या. अशातच आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला मोठा ब्रेक दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.