प्रफुल्ल पवार, महाड : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. सावित्री आणि काळ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड शहर, बिरवाडी, महाड MIDC परीसरात पुरसदृष्य परीस्थिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी संध्याकाळी महाड पोलादपूर परीसरात जोरदार पाऊस झाला असून सावित्री आणि काळ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दोन्ही नद्यांनी धोका पातळी ओलांडलीय. यामुळे महाड शहर, बिरवाडी आणि महाड MIDC परीसरात पूराची शक्यता आहे.


महाड शहरातील क्रांतीस्तंभ, दस्तुरी नाका, भोईघाट, सुकट गल्ली आणि बाजार पेठ परीसरात नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरले आहे तर खरवली येथील बंधारा दुथडी भरून वाहत असून महाड MIDC तील अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर साचले आहे. 


मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे घाटमाथ्यावर महाबळेश्वर भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने ही पाणी सावित्री नदीतून कोकणात येत आहे.