सोलापुरात क्रिप्टो करन्सीच्या नावे गुंतवणूक करणाऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. हजारो सोलापूरकरांना यामध्ये गंडा घालण्यात आला असून, लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे. पुण्यातील सोनीटिक्स नावाच्या कंपनीने ही लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. अॅपद्वारे हजारो सोलापूरकरांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. गुंतवणूकदारांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील सोनीटिक्स नावाच्या कंपनीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे शिववर्स कॉइनद्वारे ही फसवणूक केली आहे. आरोपींनी लोणावळा, परभणी, कोल्हापूर, गोवा, पुणे अशा अनेक मोठ्या शहरात कार्यक्रम आयोजित केले होते. या शहरांमध्ये त्यांनी सावज घेरत त्यांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं. 


आरोपींनी गुंतवणूकदारांनी मोठी आमिषं दाखवली होती. मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, फॉर्च्युनर, ब्रिझा अशा अनेक मोठ्या गाड्या देण्यातं अमिष त्यांनी दाखवलं होतं. इतकंच नाही तर 100 दिवसात पैसे दुप्पट करण्याचं आमिषही दाखवलं होत. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.