चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, अंबरनाथ : तुम्ही तुमच्या मुलांना स्कूलबसनं (School Bus) शाळेत सोडत असाल तर ही बातमी पाहाच. अवघ्या 3 सेकंदात होत्याचं नव्हतं कसं झालं ते. मुलांनी भरलेली एक स्कूलबस. चिमुकल्यांना घेऊन ही बस शाळेत जात होती पण उतारावर रिव्हर्स (Reverse) मारताना ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि बस उलटली. लहानग्यांना घेऊन जाणारी बस अवघ्या 3 सेकंदात उलटली. पाहा उतारावर रिव्हर्स घेताना नेमकं काय झालं ते. (school bus accident at ambernath thane district due to driver lost control on van)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघात झाला, बस उलटली तेव्हा बसमध्ये 17-18 विद्यार्थी बसलेले होते. बस उलटताच आजूबाजूच्या लोकांनी तातडीनं धाव घेतली. बसवर चढून सगळ्या विद्यार्थ्यांना तातडीनं बाहेर काढण्यात आलं. अपघातात दोन विद्यार्थ्याना किरकोळ इजा झाली, सुदैवानं सर्व विद्यार्थ्यी थोडक्यात बचावले.



अंबरनाथच्या रोटरी शाळेच्या विद्यार्थ्यांना ही खासगी मिनी स्कूल बस घेऊन जात होती. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. सकाळी पावणेसातच्या सुमारास ग्रीन सिटी संकुलात विद्यार्थ्यांनी भरलेल्या या बसला अपघात झाला. 


सुदैवानं या अपघातात कुणाला फारसं लागलं नाही. पोलिसांनी या बसच्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलंय. असा अपघात कोणत्याही स्कूलबससोबत घडू शकतो. त्यामुळे स्कूलबसचालकांनी अशा अपघाताच्या  स्पॉटकडे लक्ष देणं आवश्यक आहे.