पुणे : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकत असल्याने मोठ्या प्रमाणावर उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत आहे त्यात विशेष म्हणजे शाळकरी मुलांना उन्हाळ्याचा मोठा फटका बसत आहे, त्यामुळे उन्हाळ्यात शाळकरी मुलांच्या गैरहजेरीचे प्रमाणही वाढते आणि याचाच तोटा त्याच्या शिक्षणावर ही होत असतो.. 


याचमुळे शिक्षक संघटनानी एक मार्च पासून प्राथमिक विभागाच्या शाळा सकाळच्या सत्रात घ्याव्यात अशी मागणी केली होती, यावर पुणे जिल्ह्यापरिषदेच्या शिक्षण विभागाने यास मान्यता देत एक मार्च पासून प्राथमिक शाळा या सकाळी भरविण्याचा निर्णय घेतला व सकाळ च्या सत्रात शाळा सुरु झाल्या..