पुणे : Reopen Schools and colleges in Pune : कोरोनाचा संसर्ग पुण्यात कमी झाल्याने आता बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालये सुरु होणार आहेत. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. 1 फेब्रुवारी पासून शाळा कॉलेजेस सुरु होणार आहे, असे ते म्हणाले. (Schools and colleges to be reopened in Pune district from February 1 - Ajit Pawar) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण शाळेतच करणार आहोत. पुण्यात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मास्क मुक्ती संदर्भात मंत्रिमंडळात कुठलीच चर्चा झाली नाही. ती बातमी चुकीची आहे. आपल्याकडे मास्क लावणे अनिवार्य, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.



पुण्यातील कोरोना (Coronavirus,) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्ह्यातील शाळा कॉलेजेस सुरु न करण्याचा निर्णय मागील आठवड्यातील बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, आठवडाभर आतील परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर आज 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरु करण्यात येत असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.


मागील तीन ते चार दिवसांपासून पुण्यातील दैनंदिन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्याचप्रमाणे रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण देखील अत्यल्प आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 1 फेब्रुवारीपासून पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय सरु होण्याची शक्यता व्यक्त होत होती. आता पालकमंत्र्यांनी स्पष्ट केल्याने शाळा-महाविद्यालये सुरु होणार आहेत. मात्र, मास्क बंधनकारक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.