नाशिकमध्ये शाळा बंद, अत्यावश्यक सेवा वगळता रात्री 7 ते सकाळी 7 पूर्णपणे बंद
नाशिक जिल्ह्यात शाळा बंद ठेवण्याचे आदेश
नाशिक : नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक, नांदगाव, निफाड, मालेगाव तालुक्यात शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता रात्री 7 ते सकाळी 7 पूर्णपणे बंद राहणार आहे. १५ तारखेनंतर सार्वजनिक जागेत समारंभ, विवाहांवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक, धार्मिक, राजकीय, समारंभ बंद राहणार आहेत. धार्मिक स्थळे सार्वजनिक वापरासाठी रात्री 7 ते सकाळी 7 बंद राहणार. तसेच पूजाविधीना बंदी घालण्यात आली आहे.
शनिवारी आणि रविवारी मंदिरे पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची मंगळवारी रात्री 12 वाजेपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.