मुंबई : Varsha Gaikwad on Schools : राज्यात कोरोनाचा पुन्हा फैलाव होता दिसत आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला काही सूचना केल्या आहेत. तसेच राज्यात मास्कची सक्ती नसली तरी मास्क वापरण्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती पाहून पुन्हा मास्कसक्तीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात दोन दिवसानी शाळा सुरु होत आहेत. तर काही शाळा या 13 जूनपासून सुरु होत आहेत. कोरोना वाढत असल्याने शाळा सुरु होणार की नाही, याबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. शाळांबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांबाबत काय निर्णय, राज्य सरकार घेणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, शाळा सुरु होण्याआधी पुन्हा नवी नियमावली करण्यात येण्याची शक्यता अधिक आहे. तसे संकेत  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. त्या याबाबत म्हणाल्या, शाळांबाबत एसओपी तयार करणार आहोत.


 वर्षा गायकवाड यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही. काळजी घेऊन शाळा सुरु करणार आहोत. त्यामुळे शाळा सुरु करताना नवी नियमावली असणार हे आता नक्की झाले आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून शाळा नव्या नियमानुसार सुरु करणार आहोत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 'झी 24 तास'ला दिली.