अहमदनगर : अहमदनगरमधील प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या आर्ट स्टुडिओला रविवारी दुपारी भीषण आग लागली. यात प्रमोद कांबळे यांच्या सर्व कलाकृती जळून खाक झाल्या. यात प्रमोद कांबळे यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे आणि अनमोल कलाकृतीचे नुकसान झालं आहे. महानगरपालिकेच्य दुर्लक्षामुळे परिसरात साठलेला कचरा उचलला न गेल्यामुळे स्थानिक तो पेटवून देतात. 


आयुष्यभराची कमाई बेचिराख 


स्टुडिओ जवळच साचलेला कचरा पेटवल्यामुळे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांची आयुष्यभराची कमाई बेचिराख झाली आहे. ही आग मोठी असल्याने शेजारी असलेल्या इमारती देखील आगीच्या भक्षस्थानी पडल्या. यात एक जण जखमी झाला असून आणखी काही जीवितहानी झाली आहे का याचा शोध पोलीस आणि अग्निशमन यंत्रणा आता घेत आहे.