कोल्हापूर: गेल्या सहा दिवसांपासून महापुरामुळे बेहाल झालेल्या कोल्हापूरात सोमवारी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला. पाण्याचा विसर्ग झाल्याने आणि पावसाने विश्रांती घेतल्याने आता कोल्हापूरमधील पाणी ओसरु लागले आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामाला सुरुवात होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, यावेळी कोणताही गोंधळ टाळण्यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. 


मुसळधार पाऊस आणि धरणातून होणाऱ्या पाण्याच्या प्रचंड विसर्गामुळे तब्बल सहा दिवस सांगली आणि कोल्हापुरला पाण्याचा वेढा पडला होता. त्यामुळे नागरिकांची घरे पाण्याखील जाऊन हजारो कुटुंबे विस्थापित झाली होती. 


यानंतर राज्यभरातून कोल्हापूर आणि सांगलीच्या दिशेने मदतीचा ओघ सुरु झाला होता. गेल्या काही दिवसांमध्ये याठिकाणी राज्यभरातून मोठ्याप्रमाणावर मदतसाहित्य पाठवण्यात आले आहे. तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते याठिकाणी कार्यरत आहेत. 


सांगलवाडीत पूरग्रस्तांची घोषणाबाजी, मुख्यमंत्री माघारी


आता पूर ओसरल्यानंतर याठिकाणी रोगराई आटोक्यात ठेवणे आणि पूरग्रस्तांपर्यंत आवश्यक ती मदत पोहोचवणे, याला प्रशासनाकडून प्राधान्य देण्यात येईल. या कामात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून जमावबंदीचा आदेश काढण्यात आला आहे. 


तत्पूर्वी कालपासून कोल्हापूर शहरातील पाणी टप्प्याटप्प्याने ओसरायला सुरुवात झाली होती. यानंतर सांगली व कोल्हापुर येथील पुरगरस्ताच्या मदतीसाठी  नांदगांव शहरातून  सर्वपक्षीय फेरी मदत काढून पुरग्रस्तांना मदत गोळा करण्यात आली. शहरातील मुख्यचौकात व लहान मोठ्या व्यापरी व नागरी पेठेत फिरुन रोख रक्कम, धान्य,कपडे, धान्य जमा करण्यात आले. 


लज्जास्पद! पूरग्रस्तांची मदत करतानाही भाजप आमदाराची चमकोगिरी