यवतमाळ : वणी कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध धान्य खरेदीदारांवर धाड मारून ५० लाखांचा १५०० क्विंटल धान्य साठा जप्त करण्यात आला. बाजार समिती प्रशासनानं ही धडक कारवाई केली. वणी परिसरात सुरु असलेल्या अशा अवैध धान्य खरेदी केंद्रांमुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांसोबतच बाजार समितीचंही मोठया प्रमाणात नुकसान होतंय.


तीन ठिकाणी धाड 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 बाजार समितीच्या पथकानं तीन ठिकाणी सुरु असलेल्या अवैध धान्य खरेदी केंद्रांवर धाडी टाकल्या.


लालगुडा परिसरातील स्नेह नगर येथे उदयकुमार बोथरा यांच्या रामदेव ट्रेडर्समध्ये १५०० क्विंटल सोयाबीनची अवैध खरेदी झाल्याचे निदर्शनास आलं.


आंबेडकर चौकमधून ३० क्विंटल सोयाबीन आणि तीन क्विंटल तूर तर नांदेपेरा रोडवर १७ क्विंटल सोयाबीन जप्त करण्यात आलं.


या कारवाईमुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणलेत.