अमर काणे, झी मीडिया, नागपूर : देशाचे हृदयस्थळ असलेला नागपुरातील 'झिरो माईल' हा भारताचा केंद्रबिंदू आहे. याच झिरो माईल पॉईंट्ला आता सेल्फी पॉईंटही तयार होणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून हा सेल्फी पॉईंट तयार करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या उपराजधानीत असलेले 'झिरो माईल' हे ठिकाण देशाचे 'हृदयस्थान'... ब्रिटिशांनी शहरांमधील अंतर मोजण्यासाठी ज्या ठिकाणी स्तंभ रोवला त्याला 'झिरो माईल पॉईंट' असे नाव देण्यात आले... देशातील हा भौगोलिक मध्यबिंदू पाहण्यासाठी अनेक लोक भेट देत असतात. या झिरो माईल स्टोनचं स्वरूप चार घोडे आणि एक स्तंभ असे आहे. ते वाळूच्या दगडांनी बनलेले आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी एमटीडीसी सेल्फी पॉर्इंट करणार आहे.


देशाच्या या मध्यवर्ती बिंदूच्या ठिकाणी येणाऱ्या अनेकांना सेल्फीचा मोह आवरता येत नाही. त्यामुळे 'झिरो माईल' पॉईंटच्या माध्यमातून नागपूर पर्यटनात एक नवं ठिकाण निर्माण होईल.