जयेश जगड, झी मीडिया, अकोला : अकोल्यातील समाज कल्याण विभागातील एका वरिष्ठ लिपिकावर आज सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


मसाज करून घ्यायचा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निरंजन खंडारे असं या गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून खंडारे हा कार्यालयातील कर्मचा-यांच्या हातून महिला कर्मचाऱ्यांसमोर शर्टची बटन उघडून मसाज करून घेत होता. तसेच याच कार्यालयात कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या महिलेला निरंजन खंडारे हा अश्लील हावभाव करून अश्लील भाषेत या महिलेला चिडवत असे. तिच्या अंगावर फाईल फेकणे इत्यादी घृणास्पद प्रकार करत असल्याचा आरोप येथीलच एका महिला कर्मचारीने केली आहे. 


निरंजनला अटक


निरंजन खंडारे हा आस्थापना विभागात असल्याने निलंबन करण्याची धमकी देत असल्याची तक्रार सुद्धा सदर महिलेने आज सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. कर्मचारी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी निरंजन खंडारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून  पोलिसांनी निरंजनला अटक केलीय. गेल्या अनेक दिवसांपासून निरंजन खंडारे हा आपल्याला तसेच इतर महिला कर्मचा-यांना त्रास देत असल्याचं तक्रारकर्ता महिलेचं म्हणणं आहे. 


व्हिडिओ शूटिंगचा पुरावा


निरंजचा जाचाला कंटाळून शेवटी येथील महिला कर्मचारीने हा सर्व  प्रकार आपल्या मोबाईलमध्ये शूट करून पोलिसांना दिलाय. महिलेच्या तक्रार आणि सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे  पोलिसांनी निरंजनला अटक केली असून  पुढील तपास करीत आहेत.