COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


मुंबई : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि भाई वैद्य यांच निधन झाल्याची दु:खद बातमी समोर येत आहे. पुना हॉस्पीटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८९ वर्षांचे होते. कर्करोगाने त्यांच निधन झाल.  एक चळवळीतील कार्यकर्ता, विचारवंत आपल्यातून निसटल्याची भावना व्यक्त होत आहे. आणिबाणीचा लढा, गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा सहभाग होता. अखेरच्या श्वासापर्यंत ते नेते म्हणून सक्रिय होते. पोलिसांचा गणवेश हाफ पॅंटवरून फुल पॅंट करण्याच्या निर्णयात भाई वैद्य यांचा पुढाकार होता. 
  
 प्रामाणिकपणा, समाजवादी, साधी राहणी हे गुण भाईंकडून शिकण्यासारखे. आज त्यांच्या निधनामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. 


भाई वैद्य यांचा परिचय


भाईंनी आयुष्यभर समाजवादी विचारांची कास धरली. समाजाच्या तळागाळातील वर्गातून शेकडो कार्यकर्ते तयार केले. त्यांना राजकारणात मोठी पदे मिळावीत यासाठी ते आग्रही राहिले. एस.एम.जोशी, नानासाहेब गोरे, ग.प्र.प्रधान आणि भाई वैद्य ही समाजवादी टीम देशभरात प्रसिद्ध होती. भाईंनी गोवा मुक्ति आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, विविध कामगार चळवळीत भाग घेतला. लढे उभे केले. १९७४ साली ते पुण्याचे महापौर होते. त्याच सुमारास आणिबाणी पुकारण्यात आली होती. त्याविरोधात त्यांनी मोठा मोर्चा काढला. त्यात भाईंना स्थानबद्ध करण्यात आले होते. आणिबाणी संपेपर्यंत ते स्थानबद्ध होते. पुण्याच्या गुरुवार पेठेतून ते महापालिकेवर निवडून आले. आणिबाणी उठल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत (१९७८) ते भवानी मतदार संघातून निवडून आले. त्यांना गृह रिज्य मंत्रीपद देण्यात आले होते. त्यांच्या मंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी पोलीसांच्या गणवेशात बदल केला. पोलीसांच्या गणवेशात हाफ पँटच्या ऐवजी फूल पँट आली. पुण्याच्या विकासासाठी येथील सर्व समाज घटकांना न्याय मिळावा याकरीता माजी महापौरांनी एकत्र यावे यासाठी भाईंचा सक्रीय सहभाग होता. अलीकडे त्यांनी समाजवादी जनपरिषद हा पक्ष स्थापन केला होता.
माजी पंतप्रधान कै.चंद्रशेखर यांच्या गाजलेल्या भारत यात्रेत भाई हे चंद्रशेखर यांचे सहकारी राहिले. पुण्याजवळ परंदवडी येथे भारतयात्रा केंद्र स्थापन झाले. भाई त्या केंद्राचे अनेक वर्षे संचालक होते. चंद्रशेखर यांच्या खेरीज विश्वनाथ प्रताप सिंग, जॉर्ज फर्नांडिस, मधू लिमये, मधू दंडवते, मोहन धारीया, शरद पवार, बिजू पटनाईक, बापू काळदाते आदी नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध होते.
पुण्याच्या पूर्व भागातून अनेक कार्यकर्त्यांची जडणघडण भाईंनी केली. काँग्रेस, जनता दल आदी पुरोगामी पक्षात भाईंनी तयार केलेले कार्यकर्ते आहेत. त्यांनीच तयार केलेले पांडुरंग तरवडे, दत्ता एकबोटे हे पुण्याचे महापौर झाले.