योगेश खरेसह अमर काणे, झी मीडिया : डीआरडीओ अधिकारी डॉ. प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar) हनी ट्रॅप प्रकरणाचं कनेक्शन नागपूरनंतर आता नाशिकपर्यंत पोहोचलंय. नाशिकमधीलही 2 अधिकारी या प्रकरणात अडकल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. एटीएसनं त्यांच्या नाशिक युनिटला दोन मोबाईल क्रमांक पाठवलेत. त्याद्वारे तपास करण्याची सूचना देखील करण्यात आलीय. नाशिकच्या देवळाली कॅम्प (Nashik devlali Camp) इथं डीआरडीओसारख्या महत्त्वाच्या संस्था आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेरगिरीची पाळमुळं दूरवर
आधी पुणे, मग नागपूर, आणि आता नाशिक. पाकिस्तानी हनीट्रॅप (HoneyTrap) प्रकरणाचे धागेदोरे किती दूरवर पसरलेत, याचे धक्कादायक गौप्यस्फोट दरदिवशी होतायत. पुण्यातील डीआरडीओ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar) यानं झारा नावाच्या पाकिस्तानी महिला एजंटला (Pakistan Agent) संरक्षण विषयक गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एसआयटीमार्फत (SIT) सुरू केलेल्या चौकशीत नागपूर कनेक्शनचा उलगडा झालाय.


हनी ट्रॅपचं 'नागपूर कनेक्शन' 
कुरुलकरच्या चौकशीत बंगळुरूतला वायूदल अधिकारी निखिल शेंडेचं (Nikhil Shende) नाव पुढं आलं आहे. मूळचा नागपूरचा असलेला शेंडेही हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं समजतंय. पाकिस्तानी हेर झारा (Zara) हिच्याशी या दोघांचाही संपर्क होता. हेर झाराचा नंबर कुरुलकरनं ब्लॉक केला. तेव्हा निखिलच्या नंबरवरून झारानं कुरुलकरशी संपर्क साधला झारानं निखिलचा नंबर का आणि कसा वापरला, याबाबत आता एटीएस तपास करतंय. दरम्यान, निखिल शेंडेच्या कुटुंबीयांनी हे आरोप फेटाळून लावलेत. निखीलला कुणीतरी फसवत असल्याचा दावा त्यांनी केलाय.


मात्र एवढ्यावरच हे हनी ट्रॅप प्रकरण थांबलेलं नाही. या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचल्याची माहिती तपासात पुढं आलीय..


हनी ट्रॅपचं 'नाशिक कनेक्शन' 
नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये डीआरडीओसारखीच संस्था आहे. तिथले दोन अधिकारीही हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा संशय आहे. एटीएसनं दोन मोबाईल क्रमांकांची माहिती नाशिक युनिटला पाठवलीय. हे मोबाईल कुणाचे आहेत, याची चौकशी आता एटीएसनं सुरू केलीय. दरम्यान, प्रदीप कुरुलकरची पॉलिग्राफ टेस्ट होणार आहे. जर पॉलिग्राफ टेस्टमध्येही कुरुलकरने तोंड उघडलं नाही तर नार्को टेस्ट घेण्याची तयारीसुद्धा एटीएसने केली आहे. कुरुलकरच्या एका मोबाईलमध्ये महिलांचे अश्लिल फोटो आढळलेत. 


दरम्यान, प्रदीप कुरुलकरची लवकरच पॉलिग्राफ टेस्ट होणाराय. पॉलिग्राफ टेस्टमध्येही कुरुलकरनं तोंड उघडलं नाही तर नार्को टेस्ट घेण्याची तयारी देखील एटीएसनं केलीय. हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला सिक्रेट माहिती देणाऱ्या आणखी बड्या धेंडांची नावं त्यातून बाहेर येतील, अशी अपेक्षा आहे.