नागपूर : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने वेगळ्या विदर्भाचा ठराव संमत केला. तसेच, गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांनी वेगळ्या राज्याचे आश्वासन दिले.


बंद पुकारुन आंदोलन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात सत्ता आल्यापासून भाजपने मात्र, वेगळ्या राज्याचा मुद्दा बासनात गुंडाळला. त्यामुळे हा बंद पुकारण्यात आला. यवतमाळमध्ये शाळा महाविद्यालयही बंद करण्यात आले. 


विदर्भासाठी मोर्चा


यवतमाळसह उमरखेड, वणी, मारेगाव, नेर, याठिकाणी बंद ला चांगला प्रतिसाद मिळाला.  तर चंद्रपुरात विदर्भवाद्यांनी शहरातील गांधी चौकातून एक मोर्चा काढत शहरातील व्यापारी आणि शैक्षणिक प्रतिष्ठाने बंद करण्याचे आव्हान केले. शहरातील मुख्य मार्गावरून हा मोर्चा निघाला. हा मोर्चा पुन्हा गांधी चौकात येत विसर्जित झाला.