नागपूर:  नागपूरचं महाकाली नगर सकाळी 10 वाजता स्फोटानं हादरलं. स्फोटामुळे परिसरात भयंकर आग लागली. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, काही किलोमीटर पर्यंतचा परिसर या स्फोटाच्या आवाजाने हादरुन गेला. आग लागल्याचं कळताच घटनास्थळी अग्निशमनचे दल दाखल झालं आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे पर्यत्न सुरु झाले. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या. ही आग सिलेंडरच्या स्फोटामुळे झाल्याचं समोर आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आगीत नेमके किती सिलेंडरचा स्फोट झाला हे वृत्त अद्यापही समजून शकले नाही. मात्र अनेक सिलेंडर फुटल्याचे आवाज परिसरात ऐकू येत होते. या संपूर्ण घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप वृत्त नाही. 
मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचं निष्पन्न झालं. या घटनेमुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आलाय. या घटनेनंतर नागरिकांनी घरातून पळ काढला. रोजच्या वापरातील वस्तू घेऊन नागरिकांनी जवळच्या मैदानात आसरा घेतला आहे.