सिरम इन्सिट्यूटच्या कोरोना प्रतिबंधक लसीची देशातील पहिली चाचणी आज
पुण्यातील दोन स्वयंसेवकाना आज ही लस देण्यात आली
अरूण मेहत्रे, झी मीडिया, मराठी : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोरोना प्रतिबंधक लशीची देशातील पहिली चाचणी सुरू झाली आहे. पुण्यातील दोन स्वयंसेवकाना आज ही लस देण्यात आली. सामाजिक जबाबदारी म्हणून आपण या चाचणीत सहभागी झाल्याची प्रतिक्रिया या स्वयंसेवकांनी यावेळी दिली. कोरोनापासून बचावासाठी लस हाच एकमेव उपाय असल्याचं माहीत असल्यानं आपण हे धाडस करत असल्याचही या स्वयंसेवकांनी सांगितलं.
ही दुसऱ्या टप्प्यातील चाचणी आहे. त्यांनंतर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होईल. या संपूर्ण चाचणीचा अहवाल यायला 4 ते 6 महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे नवीन वर्षात आपल्याला ही लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. या चाचणीमध्ये सहभागी झालेले स्वयंसेवक आणि डॉक्टर्स यांच्याशी आमचे प्रतिनिधी अरूण मेहत्रे यांनी संवाद साधला आहे.
लशीच्या मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारने परवानगी दिल्याने त्याच्या यशानंतरच ती बाजारात उपलब्ध केली जाईललशीच्या मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारने परवानगी दिल्याने त्याच्या यशानंतरच ती बाजारात उपलब्ध केली जाईल. सीरम इन्स्टिट्यूट करोना प्रतिबंधक लस विकसित करीत आहे. त्याच्या चाचण्या सुरू आहेत. मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्याला नुकतीच केंद्र सरकारच्या केंद्रीय औषध महानियंत्रकानी (डीसीजीआय) मान्यता दिल्याने या लसीचे उत्पादन दृष्टीक्षेपात आल्याचे मानले जाते.