धुळे : दरोड्याच्या उद्देशाने दबा धरुन बसलेल्या मुंबईसह धुळ्यातील सात दरोडेखोरांना धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन गावठी बंदुका, जीवंत काडतुसे, तलवार, चाकू, सहा मोबाईल आणि कार असा दहा लाख नऊ हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यातील सहा दराडेखोर हे मुंबईतील बोरीवली आणि डोंबिवलीमधील आहेत. त्यांच्याविरुध्द विविध पोलीस ठाण्यांमध्ये वीसहून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यप्रदेशातील उज्जैनकडून धुळ्यातील लंळीग गावाकडे काही संशयित लोक एका कारमध्ये येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना पांढर्‍या रंगाची कार एका ठिकाणी उभी दिसली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्या कारजवळ जाण्याचा प्रयत्न करतात कार चालकाने ती पळविली. यामुळे पोलिसांनी त्या कारचा पाठलाग करुन लळींग टोलनाक्याजवळ तिला अडविली. 


त्यातील लोकांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ दोन गावठी बंदुका, जिवंत काडतूसे, एक तलवार, एक चाकू, सहा मोबाईल, मिरचीची पुढ आदी साहित्य सापडले. पोलिसांनी कारसह सर्व शस्त्र आणि साहित्य जप्त केले. यातील आरोपींविरुध्द मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या ठिकाणी खंडणी, दरोडा आदी गंभीर स्वरुपाचे वीसहून अधिक गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती मोहाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अभिषेक पाटील यांनी दिली.


अटक करण्यात आलेले दरोडेखोर


- अमित नामदेव पाटील ( बोरीवली पूर्व मुंबई)
- अभिषेक अरुण ढोबळे ( डोंबिवली पूर्व मुंबई)
- पंकज सुरेश साळुंखे (डोंबिवली पश्चिम, मुंबई)
- जितेश पुकराज लालवाणी ( डोंबिवली पश्चिम, मुंबई)
- विकास कांतीलाल लोंढे (डोंबिवली पश्चिम, मुंबई)
- मंगेश कृष्णा भोईर (डोंबिवली पश्चिम, मुंबई)