पंढरपूरमध्ये शिक्षकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार
गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी फरार
पंढरपूर : पंढरपूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यातील गार्डी गावात नराधम राहुल फाटे या नराधम शिक्षकाने पीडित विद्यार्थिनीला जवळ बोलावलं. मोबाईलमधील फोटो दाखवण्याच्या बहाण्याने नराधमाने विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचे प्रयत्न केले. मात्र पीडीत मुलीने या नराधमाच्या तावडीतून स्वतःची सुटका केली.
या सगळ्या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास बदनामी करण्याची धमकीही या नराधमाने दिली. त्यामुळे भीतीने विद्यार्थिनीने हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. मात्र पंढरपूर ग्रामीण पोलीसांचे महिला निर्भय पथक शाळेत गेल्यानंतर त्यानी मुलींशी चर्चा केली.
पीडीत मुलीने ही घटना पोलिसांना सांगितल्यानंतर सगळा प्रकार समोर आला. या प्रकरणी नराधम राहुल फाटेविरोधात गुन्हा दाखल झालाय. मात्र गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तो फरार झाला आहे.