पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. हिंजवडी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील कासारसाई परिसरात ही घटना घडली आहे. यात एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गणेश निकम या आरोपीसह आणखी एका अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


या दोन मुली मंदिरात गेल्या असताना चॉकलेटचं अमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. रविवारी घडलेली ही घटना मंगळवारी उघडकीस आली. जखमी अवस्थेतील या मुलींना उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान यातल्या एका मुलीचा मृत्यू झाला.