शहीद पोलिसांना अकोला जिल्हा पोलीस मुख्यालयात मानवंदना
नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद पोलिसांना अकोला जिल्हा पोलीस मुख्यालयात मानवंदना देण्यात आली.
अकोला : नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद पोलिसांना अकोला जिल्हा पोलीस मुख्यालयात मानवंदना देण्यात आली.
लडाखमधल्या सीमावर्ती भागातल्या बर्फाळ प्रदेशात तैनात असलेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 10 जवान, 21 ऑक्टोबर 1959 रोजी घुसखोर चीनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झाले होते. तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा दिवस देशभर पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो.
त्याचाच भाग म्हणून अकोला पोलीस मुख्यालयात, देशांतर्गत सुरक्षेसाठी बलिदान देणाऱ्या पोलिसांचं स्मरण करण्यात आलं. मोठ्या संख्येने यावेळी नागरिकही उपस्थित होते.