महाराष्ट्र दिन ! शहिदांना पत्नींना मोफत एस.टी प्रवास, आज शिवाजीपार्कवर सन्मान सोहळा
मुंबई : महाराष्ट्र दिनाला शहीद जवानांच्या वीर पत्नींच्या सन्मानार्थ आजीवन मोफत प्रवास देण्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केलीय. तसंच शहिदाच्या एका पाल्याला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एस टी महामंडळात नोकरी देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या बसेसमधून ही मोफत सेवा देण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आज राज्यपालांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. प्राथमिक स्वरूपात या मोफत प्रवासाचे स्मार्ट कार्ड ५ वीरपत्नींना देण्यात येणार आहे. मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्कवर हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित राहणार आहेत.