शहापूर : रुग्णवाहिका असूनही उपलब्ध करून न दिल्याने झालेल्या दिरंगाईत बाळाचा मृत्यू झाल्याचा प्रकार शहापूर येथे समोर आला. यानंतर रुग्णालयातर्फे सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रुग्णालयातील कोणताही डॉक्टर किंवा वरिष्ठ पदाधिकारी माध्यमांसमोर येणं टाळत होता. पण झी मीडियाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सिविल सर्जनची प्रतिक्रिया समोर आली आहे. यासंदर्भात अहवाल मागवला असल्याचे यावेळी सिविल सर्जनने सांगितले.

 

डोळखांब  दरेवाडी येथील राहणारी १९ वर्षीय  महिला  प्रसूतीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती . प्रसुती होऊन तिला गोंडस मुलगा झाला मात्र  कमी दिवस भरल्याने त्या नवजात बालकाला श्वसनाचा त्रास सुरू झाला. रुग्णालयात बालरोग तज्ञ नसल्याने डॉक्टरांनी त्यांना  खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले.  त्यानुसार त्या बालकाला नातेवाईकांनी खाजगी रुग्नालयात  नेले मात्र  बाळाची आई मात्र उपजिल्हा रुग्णालयातच  होती.  दरम्यान बाळ  खासगी रुग्णालयात नेत असतानाच  दगावले.  मृत बाळाला घरी बेरवाडी येथे न्यायचे  असल्याने रुग्णवाहिकेची गरज होती . त्यामुळे  बाळाला  हातात धरून नातेवाईक रुग्णालयासमोर रस्त्यात रुग्णवाहिकेची  वाट बघत उभे होते मात्र  रुग्णालयाच्या  दारात रुग्णवाहिका असूनही ती देण्यात टाळाटाळ  करण्यात आली. 

तीन तासानंतर रुग्णवाहिका 


डॉक्टरांनी आणि  कर्मचार्यांनी तब्बल तीन तास तासानंतर रुग्णवाहिका दिली  मात्र तो पर्यंत  नातेवाईकांची  फरफट  झाली . यावर झी मीडियाच्या टीमने सिविल सर्जन यांना या बाबत विचारले असता यावर कॅमेरा समोर येऊन बोलण्यास त्यांनी नकार दिला आणि हा प्रकार असा झाला नाही अशी टाळाटाळ केली परंतु झी मीडियाने स्टिंग ऑपरेशन करून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली त्यांनी यावर आम्ही अहवाल मागवला आहे असे सांगितले.