शरद पवार यांची निवृत्तीची घोषणा, आता राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष कोण?
Sharad Pawar Resignation: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी राजकीय जीवनातून निवृत्तीची जाहीर घोषणा केली. या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण केंद्राच्या सभागृहात निदर्शने केली. शरद पवारांच्या या निर्णयानंतर कार्यकर्ते भावूक झाले होते.
Sharad Pawar Announce Retirement: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या 'लोक माझे सांगती' या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे आज (2 मे 2023) प्रकाशन झाले. यावेळी पवारांनी राजकीय जीवनात तीन वर्षे शिल्लक असूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. शरद पवार यांच्या या घोषणेनंतर सभागृहात उपस्थित राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पवारांच्या या निर्णयाला विरोध दर्शवला. तसेच सभागृहात कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येणार आहे. नवीन समितीच अध्यक्षपदाचा निर्णय घेण्यात येईल, असे सभागृहात शरद पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपमध्ये जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये चर्चा सुरू असल्याचे ही काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले होते. याचदरम्यान आता पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पद सोडणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. शरद पवार हे भारतीय राजकारणातील दिग्गज नेते आहेत. त्यांचा राजकीय अनुभव सर्वांना माहीत आहे. मात्र त्यांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रवादीची धुरा कोणता नेता घेणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
प्रफुल्ल पटेल
याचदरम्यान शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीची धुरा कोणता नेता घेणार यावर पहिले नाव राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे आले आहे. प्रफुल्ल पटेल हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आहेत. ते ४ वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. ते राज्यसभा सदस्यही राहिले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत. ते अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्षही आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.
जयंत पाटील
जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे नेते आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे माजी मंत्री आहेत. राष्ट्रवादी पक्षांना मोठे स्थान आहे. त्यामुळे त्यांचीही नावाची चर्चा होत आहे.
अजित पवार
विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ही नावाची चर्चा होते. राष्ट्रवादीमध्ये ते नंबर २ चे नेते आहेत. अजित पवार हे भाजपच्या संपर्कात असल्याचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. पण शरद पवार येतात, ते निवृत्त होत असल्याने अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्या आहेत. ते बारामतीचे विद्यमान खासदार आहेत. सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या असून त्या गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांच्याही नावाची चर्चा आहे.