शरद पवारांनी मुलाखतीतून केली मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याची पोलखोल
शरद पवार यांची राज ठाकरे घेत असलेली मुलाखत चांगली रंगत चालली असून यात शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ प्रसिद्ध वक्तव्याचा खराखोटा खुलासा करून टाकला.
पुणे : शरद पवार यांची राज ठाकरे घेत असलेली मुलाखत चांगली रंगत चालली असून यात शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ प्रसिद्ध वक्तव्याचा खराखोटा खुलासा करून टाकला.
मोदींच्या वक्तव्याची पोलखोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या त्यांच्या भाषणात एक-दोनदा शरद पवार हे माझे गुरू आहेत. मी त्यांचंच बोट धरून राजकारणात आलो असे विधान केले होते. पण पंतप्रधानांच्या या वक्तव्याची पोलखोल शरद पवार यांनी मुलाखतीत केली.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री असताना दिल्लीला बैठकीला यायचे. तेव्हा त्यांची एक गोष्ट आम्हाला खटकायची ती म्हणजे ते बैठकीत अत्यंत आक्रामकपणे पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर हल्ला करायचे. मनमोहन सिंह हे अत्यंत सभ्य व्यक्ती. त्यामुळेच कॉंग्रेसचा गुजरातकडे बघण्याचा दुष्टीकोन अनुकूल नसायचा. यात मी असा विचार करायचो की, गुजरात हा देशाचा भाग आहे. देशाचा विचार होताना गुजरातचाही विचार असायचा. त्यावेळी ते पंतप्रधान होण्याआधी दिल्लीत आले की, माझ्या घरी यायचे. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी जे वक्तव्य केलं की, ते माझी करंगळी धरून राजकारणात आले. पण मुळात माझी करंगळी त्यांच्या हातात कधी सापडली नाही. हे खोटं आहे’.