गुन्हा घडला असेल तर खुशाल चौकशी करा - शरद पवार
हा सत्तेचा गैरवापर असल्याचं यावेळी शरद पवार यांनी सांगितलं.
शिर्डी : गुन्हा घडला असेल तर खुशाल चौकशी करा, असं आव्हान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारलं दिलं आहे. पी चिदंबरम यांना जेलमध्ये टाकलंय, हा सत्तेचा गैरवापर असल्याचं यावेळी शरद पवार यांनी सांगितलं.
सत्ता आज आहे, उद्या नाही असं म्हणतात, त्या प्रमाणे शरद पवार यांनी म्हटलं आहे, जर समजा उद्या तुम्ही सत्तेबाहेर गेलात आणि आम्ही सत्तेत आलो, तर मात्र आम्ही असं सुडाचं राजकारण करणार नाहीत, असं यावेळी शरद पवार यांनी सांगितलं.
शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे, त्यावर गुन्हा घडला तर खुशाल चौकशी करा असं शरद पवारांनी म्हटलं आहे. गुन्हा केला नसेल, तर घाबरायचं कारण, काय चौकशीला सामोरं जाण्यास कोणतीही हरकत नसल्याचं याआधी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.