Pawar vs Pawar : पवार... महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठ्ठं नाव... मात्र याच आडनावावरून शरद पवार आणि अजित पवारांमध्ये चांगलीच जुंपली आहे.  पवार आडनाव असेल तिथेच मतदान करा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत केलं.. त्यांचा रोख अर्थातच पवारांची कन्या सुप्रिया सुळेंकडे होता.  त्यावर शरद पवारांनीही आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलं. मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार.. इतक्या मोजक्या शब्दात पवारांनी अजित पवारांसह त्यांची पत्नी सुनेत्रा पवारांना टोला लगावला..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पवारांनी सूनबाई सुनेत्रा पवारांचा बाहेरून आलेल्या पवार असा उल्लेख केल्यानं त्यांच्यावर टीकेची झोड उठलीय... मुलीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झाल्याची टीका राष्ट्रवादी अजित पवार गटानं केलीय. तर अजित पवारांच्या लग्नाला 39 वर्ष होऊनही सून बाहेरची कशी होऊ शकते? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी विचारला आहे. 


बारामतीमधील सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या राजकीय लढतीचं रुपांतर आता कौटुंबिक संघर्षात झाला आहे. जसजशी मतदानाची तारीख जवळ येईल, तसतसा पवार विरुद्ध पवार हा वाद आणखी विकोपाला गेला, तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.


मुलीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झाले -  रुपाली पाटील ठोंबरे यांची टीका


शरद पवारांनी मूळचे पवार आणि बाहेरचे पवार यावर केलेल्या विधानाचा वाद आता चांगलाच पेटलाय.. सुनेत्रा पवारांवर टीका करताना शरद पवारांनी त्यांचा उल्लेख बाहेरचे पवार असा केला होता.. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे तसंच सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चांगलाच समाचार घेतलाय. मुलीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झाल्याची टीका रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलीय. तर अजित पवारांच्या लग्नाला 39 वर्ष होऊनही सून बाहेरची कशी होऊ शकते.. ती त्यांची होत नाही का असा सवाल अंजली दमानियांनी विचारलाय..


सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकावर आणि बॅनरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे फोटो


बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकावर आणि बॅनरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे फोटो छापण्यात आलेयत...मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांकडून राज ठाकरेंचे फोटो बॅनरवर छापण्यात आलेयत...बॅनरवर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवारांसोबत आता राज ठाकरेंचादेखील फोटो लावण्यात आलाय...


माढ्यामधील महायुतीचा वाद मिटेना


माढ्यामधील महायुतीचा वाद काही केल्या कमी होत नाहीये...आज रणजित निंबाळकरांनी थेट नागपूर गाठत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि माढ्यामध्ये महायुती धर्म पाळण्यासंदर्भात चर्चा केली...आता अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि रणजित निंबाळकर अशी तिघांची बैठक होणारे...दोन दिवसांत होणा-या बैठकीमध्ये माढ्यातील महायुतीचा वाद मिटण्याची शक्यता आहे...