सातारा : आपल्यावर कोणत्याही पद्धतीचा दबाव नाही, त्यामुळे कोणत्या पक्षात जायचे हा प्रश्न आपल्यासाठी गौण आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दुखवायला जमणार आहे की नाही, हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले आहे. येत्या आठ दिवसांत नेमके काय करायचे याबाबत निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, माजी खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात मोठा वाद होता. त्यामुळे रामराजे नाराज होती. त्यांना तरी ठेवा नाहीतर मला, अशी टोकाची भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र, राष्ट्रवादीकडून काहीही हालचाल होताना न दिसल्याने ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मात्र, या चर्चेला पूर्णविराम मिळाल्यात जमा आहे. कारण माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.


त्याआधी, भाजपत प्रवेश करण्याच्या तयारीत असणाऱ्या उदयनराजे भोसले यांना ती मोठी माणसे असल्याचा टोलाही यावेळी रामराजे नाईक निंबाळकरांनी लागावला. फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांनी राजकीय भूमिका घेण्यासाठी महामेळावा आयोजित केला होता. 


मी आज तरी राष्ट्रवादीतच आहे, उद्याचे उद्या पाहू असे रामराजे निंबाळकर यांनी केले. दरम्यान, आता उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर रामराजेंची अडचण दूर झाल्याची चर्चा आहे. पण सध्यातरी शरद पवारांची साथ सोडावी, असे वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. रामराजे यांनी कार्यकर्ता मेळावा बोलावला असून त्यानंतर कार्यकर्ते काय ठरवतील यावरून निर्णय घेऊ असेही म्हटले आहे. त्यामुळे रामराजे हे आता राष्ट्रवादीतच राहणार हे स्पष्ट होत आहे.