शरद पवार यांनी पुन्हा आरएसएसच्या कामाचं कौतुक केलंय. विधानसभेत संघानं प्रचाराची रणनीती ठरवली होती. त्यामुळे विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळाल्याचं शरद पवार म्हणालेत. शरद पवार यांच्या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयात संघाचा मोठा वाटा असल्याचा निष्कर्ष शरद पवार यांनी काढलाय. निवडणूक काळात संघानं केलेल्या कामाचं शरद पवार यांनी कौतुक केलं आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. त्या यशात संघाच्या कामाचा मोठा वाटा असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. संघाच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेची निवडणूक हाती घेतल्याचंही शरद पवार म्हणाले.


संजय राऊतांकडून संघाच्या कामाचं कौतुक


संघ परिवाराच्या लोकांनी विधानसभा निवडणुकीत बूथ आणि जे मॅनेजमेंट केलं ते कौतुकास्पद होतं. हे मान्य केलं पाहिजे. प्रत्येक बूथवर किती मतं वाढवायची आणि ती कशा पद्धतीने वाढवायची, मग यंत्रणा विकत घेणं. यंत्रणेवर दबाव आणणं. प्रत्येक बूथवर त्यांनी काम केलं. त्याचा त्यांना निवडणुकीत फायदा झाला असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 


तर शरद पवार यांनी संघाबाबत केलेलं विधानं खरं आहे. त्याच्या कामगिरीमुळे विधानसभेत चांगलं यश मिळाल्याचं धर्मरावबाबा आत्राम म्हणाले. 


आरएसएसने विधानसभेत घरोघरी जाऊन प्रचार केला


आरएसएसने विधानसभा निवडणुकीत घरोघरी जाऊन प्रचार केला. ज्यामध्ये त्यांनी घरोघरी जावून आपला धर्म धोक्यात आहे. बंटेंगे तो कटेंगे या पद्धतीने त्यांनी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून दिला आणि त्यांनी विधानसभेत नरेटीव्ह सेट केलं. ते खोडून काढण्यात महाविकास आघाडीला यश आलं नसल्याची कबुली विकास लवांडे यांनी दिलीय. 


पराभवाचं विश्लेषण करताना पवारांनी भाजपच्या यशाचं श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिलंय. महायुतीला टक्कर द्यायची असेल तर संघ स्वयंसेवकांसारखं केडर उभ केलं पाहिजे असा संदेश तर पवारांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिला नाही ना अशी चर्चा सुरु झालीये.