ताफा थांबवून शरद पवारांनी केली अपघातग्रस्तांना मदत
नागपूरहून गडचिरोलीला जात असताना रस्त्यात अपघातग्रस्त कुटुंबियांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार धाऊन आले.
गडचिरोली : नागपूरहून गडचिरोलीला जात असताना रस्त्यात अपघातग्रस्त कुटुंबियांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार धाऊन आले.
शरद पवार चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. सकाळी नागपूर विमातळावर आगमन झाल्यावर पवार थेट मोटारीने गडचिरोलीला निघाले. मात्र नागपूर जवळच्या भिवापूर रस्त्यावरुन पवरांचा ताफा जात असताना तिथे एका कारचा अपघात झाल्याचं शरद पवारांनी पाहिलं. कारमध्ये पती-पत्नी आणि त्यांची दोन मुलं अडकून पडली होती. पवारांनी लगेच आपला ताफा थांबवून सोबतच्या पोलिसांना अपघातग्रस्तांची मदत करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, ताफ्यातले पोलीस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जखमींना तातडीनं कारमधून बाहेर काढलं आणि नजिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतरच शरद पवार गडचिरोलीकरता रवाना झाले.