पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाजी महाराजांचा इतिहास हा चुकीच्या पद्धतीनं शिकवला गेल्याचं विधान पवारांनी पुण्यात केलंय. ज्ञानाची मक्तेदारी ज्यांच्याकडे होती त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी सोयीचा इतिहास रंगवला, असंही त्यांनी म्हटलंय. 


श्रीमंत कोकाट लिखित 'छत्रपती शिवाजी महाराज' या पुस्तकाचं प्रकाशन आज पवारांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी पवार बोलत होते.


'सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश हे शिवछत्रपतींचं सूत्र होतं. छत्रपतींनी उभारलेलं राज्य भोसल्याचं नव्हे... रयतेचं राज्य होतं, असही पवार म्हणाले. 


छत्रपतींची गोब्राह्मण प्रतिपालक ही प्रतिमा खोटी आहे... शेजवलाकांनी त्या प्रतिमेला अऐतिहासिक म्हटलंय. पण तीच चुकीची माहिती समाजात पसरवली जाते... ही गोष्ट अस्वस्थ करणारी आहे. नव्या पिढीपर्यंत खरा इतिहास पोहचायला हवा असंही पवारांनी म्हटलंय. 


शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी होते असं चुकीचं चित्र रंगवलं... अफजुखानचा (पवारांनी केलेला उच्चार) कोथळा बाहेर काढला. पण त्याचा साथीदार कृष्णाजी कुलकर्णीचीही हत्या केली, असंही त्यांनी म्हटलंय.