बारामती : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना  कोरोनाची लागण झालीय. बारामतीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. आज ही संख्या ४७३ झाली आहे. ५००च्या जवळपास पोहोचली आहे. पवारांच्या घरी काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे शेतात, बागेत काम करणारे कर्मचारी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोविंद बागेतील जवळपास ५० कर्मचाऱ्यांचे दोन टप्प्यात स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी आज ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापूर्वी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी १२ कर्मचाऱ्यांना  कोरोना झाला होता. 



दरम्यान, पवार नियमितपणे बारामती निवासस्थानी येत असतात, काही दिवसांपूर्वी त्यांच्या बारामतीत दौरा होता. मात्र तो अचानक रद्द झाला होता.


सध्या प्रशासनाच्या वतीने प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोनावर मात करण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत ?, करता येतील ? त्याचा आढावा घेतला आहे.